ठाणे

महिला डब्यात जागा न मिळाल्याने महिला घुसली थेट मोटारमनच्या केबिनमध्ये ; जाणून घ्या, नक्की काय आहे प्रकरण

नवशक्ती Web Desk

लोकलला मुंबईची लाईफ लाईन समजली जाते. सकाळच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. कल्याण, ठाणे परिसरातून मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग मुंबईच्या दिशेने नोकरी निमित्ताने जात असतो. आज मात्र सकाळी खोपोलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमध्ये दिवा स्थानकात एक घटना घडली. एका महिलेला गर्दी जास्त प्रमाणावर असल्याने महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात जाता आलं नाही. यामुळे या महिलेने थेट मोटारमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकलला उशिर झाला.

मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे लोकलला उशीर झाला. संबंधित महिलेला गर्दी असल्या कारणाने लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी आरक्षित डब्चयात प्रवेश मिळाला नाही. यावेळी महिलेने मोटरमनला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. मात्र, मोटरमनला वेळापत्राकाचं पाल करायचं असल्याने त्याने लोकल सुरु केली. यावेळी त्या महिलेने थेट मोटारमनच्या केबिनमध्ये प्रवेश करुन त्याला लोकल थांबवण्यास प्रवृत्त केलं.

अचानक घडलेल्या प्रसंगामुळे मोटरमननं लोकल थांबवली. यानंतर त्याने महिलेला केबिनमधून खाली उतरण्यास सांगितलं. मात्र, महिलेने नकार दिला. मोटरमनने दिवा स्थानकातील अधिकारी आणि आरपीएफला माहिती याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेला डब्यात प्रवेश मिळवून दिला. यानंतर लोकल निघाली. दिवा स्तानकातील आरपीएफच्या पथकानं या महिलेवर कुर्ला स्थानकापर्यंत लक्ष ठेवलं. कुर्ला स्थानकात या महिलेला ताब्यात घेण्यासाठी आरपीएफच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या. महिलेला ताब्यात घेतल्यानंतर दिवा स्थानकात आणण्यात आलं. याठिकाणी या महिलेवर भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी रेल्वेला सहकार्य करण्याचं आवाहन देखील अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं. खोपोली, कर्जत आणि कल्याणहून पुरेशा प्रमाणात लोकल ट्रेन मुंबईला जाण्यासाठी उपलब्ध नसल्याने या घटना घडतात, असं प्रवाशांचं म्हणनं आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल