ठाणे

भारत गॅस एजन्सीची गागोदे गावातून केली हकालपट्टी

वृत्तसंस्था

केंद्र सरकारच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने सर्व्हिसच्या नावाने प्रत्येक गॅसधारकाकडून २३६ रूपये उकलण्याचे काम सुरू केलेलं आहे. गागोदे बुद्रुक गावामध्ये एकूण १५० गॅसधारक असून त्यांच्याकडून २३६ रूपये प्रमाणे ३४५०० रूपये गोळा करणार होते. गावातील सर्व ग्रामस्थांना ही माहिती मिळताच सर्व ग्रामस्थ गोळा झाले.

भारत गॅस एजन्सी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रश्नाचा विचारले तेव्हाच त्यांच्याकडून योग्य अशी उत्तरे मिळाली नाही. ही भाजप प्रणित मोदी सरकार पुरस्कृत लूट आहे. म्हणून ग्रामस्थांनी त्या भारत गॅस धारकाच्या कर्मचाऱ्यांना गागोदे गावातून हकालपट्टी केलेली आहे. आणि गावातील ५/६ गॅसधारकांचे २३६ रूपये गॅस सर्व्हिसच्या नावाने जमा केले होते ते पैसे गागोदे ग्रामस्थांनी परत घेतले.

पेण येथील वरदान गॅस एजन्सी येथे जाऊन सर्व माहिती घेतली आणि हिंदुस्थान कार्पोरेशन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीने काढलेल्या पत्रकाचा आम्ही विरोध करतो असे त्यांना ठणकावून सांगितले. पेण तालुक्यातून कुठेही सर्व्हिसच्या नावाने २३६ जमा करू नका असे आवाह केले.

या सर्व्हिस चार्जच्या माध्यमातून पेण तालुक्यातून १ कोटी १८ लाख रुपये, रायगड जिल्ह्यातून सुमारे १२ ते १५ कोटी रुपये, महाराष्ट्रातून ५०० ते ५५० कोटी रुपये आणि देशभरातून ८५६० कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत.

ही भाजप प्रणित मोदी सरकार पुरस्कृत मोठी लूट आहे म्हणूनच लवकर या विरोधात पेण तालुक्यात मोठा आंदोलन करणार आहोत. या आंदोलनात सर्व जनतेने सहभागी व्हावे असेही आवाहन संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी केले आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल

तुलसी एक्स्प्रेसमध्ये बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप; ठाणे रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

अखेर २५ दिवसांनी घरी परतला 'तारक मेहता...' चा सोढी; दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

का वाढेना मतदानाचा टक्का?