PM
ठाणे

ठाणे : वर्षश्राद्धानिमित्त आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण दिले; ७० जणांना विषबाधा

Swapnil S

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांना दुपारच्या अन्नातून विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

भातसई आश्रम शाळेच्या विभागातील विद्यार्थ्यांना वर्ष श्राद्ध कार्यक्रमानिमित्त एका व्यक्तीने उदात्त हेतूने दिलेल्या दुपारच्या जेवणात पुलाव व गुलाबजाम हे पदार्थ होते. मात्र, हे जेवण जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ अशा समस्या जाणवू लागल्याने आश्रम शाळेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने आदिवासी पालक व आदिवासी संघटना अधिकच आक्रमक झाल्या. त्यांनी दोषी अधिकारी, कर्मचारी आणि बेजबाबदार प्रकल्प अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबतीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, मनसे नेते संतोष शिंदे, भाजप आदिवासी आघाडीचे अशोक इरणक, मनसेचे सचिव हॅरी खंडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विनायक सापळे, पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, शहापूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व शहापूर पोलीस प्रशासनाने सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त