ठाणे

भिवंडीत कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालक फरार

ठाणे-नाशिक मार्गावर भिवंडीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पादचाऱ्याला जोरात धडक दिल्याने पादचाऱ्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

Swapnil S

भिवंडी : ठाणे-नाशिक मार्गावर भिवंडीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पादचाऱ्याला जोरात धडक दिल्याने पादचाऱ्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

उमाशंकर महेश शर्मा (३२) असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालका विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,३ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास उमाशंकर हा भिवंडी बायपास जवळील रिक्षास्थानकावर उभा असताना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने उमाशंकर यास जोरात धडक दिली. या धडकेत उमाशंकर खाली पडून कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय स्व.इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून ट्रक फरार झाला असून त्याच्या विरोधात लवकुश सिताराम शर्मा (३८) याच्या फिर्यादीवरून कोनगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून

पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. पुढील तपास सपोनि वैभव मुबळे करीत आहेत.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नसल्याचा लगेच निष्कर्ष काढू नका! AAIB अहवालावर एअर इंडियाच्या ‘सीईओं’चे विधान

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा