ठाणे

भिवंडी : भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला उडवले; जागीच मृत्यू

घटनेनंतर टेम्पोचालक फरार, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Swapnil S

भिवंडी : ठाणे-भिवंडी वाहिनीवरील कशेळी गावच्या हद्दीतील निसार ऑईल डेपोसमोर भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोचालकाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली असता झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

रमजान मुतालीब खान (३५) असे अपघातात मयत पावलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी टेम्पोचालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मयत रमजान हा दुचाकीने जात असताना त्याला पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोचालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत रमजानचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला असून याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संतोष शिंदे करीत आहेत.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार