ठाणे

'त्या' बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह मोडकसागर पात्रात सापडला; विसर्गाच्या पाण्यात गेले होते वाहून

सोमवारी दुपारच्या सुमारास भास्कर पादीर यांचा मृतदेह मोडकसागर पात्राजवळ सापडला आहे.

Swapnil S

मोखाडा : मध्य वैतरणा धरणातून कोणतीही पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने बेसावधपणे सावर्डे गावच्या लोखंडी पुलावरून जात असताना भास्कर पादीर आणि रुचिका पवार ही दोघे जोरदार प्रवाहाबरोबर वाहून चालली होती. यावेळी पुलाजवळ उपस्थित नागरिकांनी रुचिकाला वाचवले. मात्र भास्कर पाटील यांना आपला तोल सांभाळता न आल्यामुळे ते पाण्याबरोबर वाहत गेले होते. सोमवारी दुपारच्या सुमारास भास्कर पादीर यांचा मृतदेह मोडकसागर पात्राजवळ सापडला आहे.

मध्य वैतरणा धरणातून शनिवारी पाचही दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तथापी अशा प्रकारे विसर्ग होणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना सावर्डे, दापूरे आणि सावरखुट येथील ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे रिकाम्या पात्रातून निर्धास्तपणे रहदारी सुरू होती. परंतु ऐन मध्यावर पोहोचल्यावर मोठा जलस्रोत आल्याने पादीर यांना सावरायला वेळच मिळाला नाही.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश