ठाणे

याद राख इकडे पेपर विकलेस तर...फेरीवाल्याची वृत्तपत्र विक्रेत्याला धमकी

शंकर जाधव

याद राख इकडे पेपर विकलेस तर, ही जागा आमची आहे अशी धमकी एका फेरीवाल्याने वृत्तपत्र विक्रेत्याला दिल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. वृत्तपत्र विक्रेत्यांना अश्या प्रकारे धमकी देण्याची ही पहिली वेळ नव्हती. अनेक वेळेला फेरीवाल्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संदीप मुसळे हे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता अनेक वर्षांपासून डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेर वृत्तपत्र विकतात. बुधवारी सकाळच्या सुमारास मुसळे हे नेहमीप्रमाणे वृत्तपत्र विकत असताना त्याच्याजवळ एक फेरीवाला आला. याद राख इकडे पेपर विकलेस तर..ही जागा आमची आहे अशी धमकी दिली. फेरीवाल्यांशी वाद नको म्हणून मुसळे हे शांत राहिले. आपली जागा जाणार .. मग आपला उदरनिर्वाह कसा होणार या विचाराने मुसळे यांनी शांत राहण्याचा मार्ग पत्करला. दरम्यान स्टेशन बाहेरील सर्व फेरीवाले हे गुंड प्रवृत्तीचे नाहीत. प्रमाणिकपणे काम करणारे फेरीवाल्यांची कोणतीही तक्रार आजवर आली नाही. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांमुळे आमच्या सारख्या माणसांना त्रास होत असल्याचे मुसळे यांनी सांगितले.

स्टेशन बाहेर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच वृत्तपत्र विक्रेते आहे. वृत्तपत्र विक्रेते हे फेरीवाला धोरणात येत नाही. तरीही पालिका प्रशासनाकडून या वृत्तपत्र विक्रेत्यांना बसण्यास अनेक वेळेला मनाई केली जाते.

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

पियुष गोयल यांच्यासाठी सोपी वाट

फडणवीसांनी टाकला डाव; अभिजित पाटलांची साथ, माढ्यात चक्रे फिरविली

‘क्राऊड पुलर’ नरेंद्र मोदी