ठाणे

Video : ...त्याने चक्क टोइंग व्हॅनखाली झोपून दुचाकी सोडवली; कल्याणमधील घटना व्हायरल

नो पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्याआधी टोइंग व्हॅनमधून अनाऊंसमेंट करणे आवश्यक असून त्याठिकाणी वाहनचालक आल्यास ती गाडी उचलू शकत नाही. मात्र...

Swapnil S

डोंबिवली : नो पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्याआधी टोइंग व्हॅनमधून अनाऊंसमेंट करणे आवश्यक असून त्याठिकाणी वाहनचालक आल्यास ती गाडी उचलू शकत नाही. मात्र वाहन उचलताना वाहनचालक आला असता त्याला वाहन दिले नसल्याने त्याने त्याने चक्क टोइंग व्हॅनखाली झोपून दुचाकी सोडवली. हा प्रकार गुरुवारी कल्याणमधील खडकपाडा परिसरात घडला.

वाहतूक पोलिसांनी दुचाकी टोइंग केल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपून आपला संताप व्यक्त केला होता. ही घटना एका नागरिकाने आपल्या मोबाईलमधून कैद केली होती. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. गाडी टोइंग केल्याने वाहतूक पोलिसांच्या गाडीसमोर झोपून या व्यक्तीने आपली दुचाकी परत मिळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी गाडी पुढे काढण्यासाठी वाहतूक पोलिसांसमोर कोणताही मार्ग राहिला नसल्याने त्यांनी त्या व्यक्तीची टोइंग केलेली गाडी सोडून दिली.

बघा व्हिडिओ

सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बेताल वक्तव्यावरून वाद; पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप