ठाणे

वाहतूककोंडीमुळे कल्याणचे नागरिक-वाहनचालक त्रस्त; ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाला सुरुवात नाहीच

कल्याण नगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पौर्णिमा चौक ते प्रेम ऑटो दरम्यानचा रस्ता एमएमआरडीए आणि पालिकेच्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र दोन दिवस उलटूनही काम सुरू न झाल्याने नागरिकांचा, वाहनचालकांचा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांना जाब विचारत गोंधळ घातला.

Swapnil S

डोंबिवली : कल्याण नगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पौर्णिमा चौक ते प्रेम ऑटो दरम्यानचा रस्ता एमएमआरडीए आणि पालिकेच्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र दोन दिवस उलटूनही काम सुरू न झाल्याने नागरिकांचा, वाहनचालकांचा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांना जाब विचारत गोंधळ घातला.

कल्याण शहरातील नगर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी वापरला जाणारा पौर्णिमा चौक ते प्रेम ऑटो दरम्यानचा रस्ता एमएमआरडीए आणि महानगरपालिका यांनी ड्रेनेज दुरुस्तीसाठी दोन दिवसांसाठी बंद केला होता. मात्र, प्रशासनाने जाहीर केलेल्या त्या दोन दिवसांत एका दगडाचा हलवाही करण्यात आलेला नाही. आता तब्बल तीन दिवस उलटून गेले तरीही रस्त्यावर काम सुरू झालेले नसल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. वाहनचालकांना दोन मिनिटांचे अंतर पार करताना अर्धा तासापेक्षा अधिक वेळ रस्त्यावर थांबावे लागत आहे. इतर मार्गांवरही प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. यामुळे संतप्त नागरिक, वाहनचालक आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. त्यांनी थेट वाहतूक बंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री