(संग्रहित छायाचित्र)
ठाणे

कल्याण-डोंबिवलीजवळील उंबार्ली गावात बिबट्याचा वावर

मानपाडा पेट्रोल पंपाजवळील डाव्या बाजूच्या वळणावर, ‘कावळ्याचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबार्ली परिसरात रात्री बिबट्या फिरताना दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Swapnil S

डोंबिवली : कोकणात तसेच काही ठिकाणी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू असताना आता कल्याण-डोंबिवलीजवळील उंबार्ली गावात गुरुवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानपाडा पेट्रोल पंपाजवळील डाव्या बाजूच्या वळणावर, ‘कावळ्याचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबार्ली परिसरात रात्री बिबट्या फिरताना दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले. हिरेश मडवी हे आपल्या चारचाकी वाहनातून गावातून जात असताना अचानक त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. धडक कशाची आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तत्काळ वाहनाच्या हेडलाइटचा प्रकाश पुढे टाकला असता, समोरच बिबट्या उभा असल्याचे त्यांना स्पष्ट दिसले. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाला तत्काळ माहिती देण्यात आली आहे.

भारत-रशिया मैत्रीचे नवे पर्व! मोदी-पुतीन गळाभेट, जंगी स्वागत; द्विपक्षीय परिषदेत संरक्षण, व्यापार, स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सवर भर

राणी बागेतील रुद्र वाघाचा मृत्यू; सलग दोन वाघांच्या मृत्यूबाबत प्रशासनाची लपवाछपवी

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता एप्रिल २०२६ चा मुहूर्त; गडकरी यांची लोकसभेत घोषणा

हवाई गोंधळ सुरूच! इंडिगोची सेवा विस्कळीतच; ५५० विमाने रद्द; विमानतळावर हजारो प्रवाशांना मनस्ताप

कामगार सुरक्षा, महिला सक्षमता