जितेंद्र आव्हाड, नजीब मुल्ला (डावीकडून) 
ठाणे

वाढीव मतदानाने उमेदवारांमध्ये धाकधूक; कळवा-मुंब्र्यात घड्याळ धावणार की तुतारी वाजणार?

Maharashtra assembly elections 2024: महाराष्ट्रातील प्रमुख लढतीमधील एक समजल्या जाणाऱ्या मुंब्रा-कळवा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. या मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले असून सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. संपूर्ण मतदारसंघातच चांगले मतदान झाले असल्याने कळवा-मुंब्र्यात घड्याळ धावणार की तुतारी वाजणार हे आता २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

Swapnil S

ठाणे : महाराष्ट्रातील प्रमुख लढतीमधील एक समजल्या जाणाऱ्या मुंब्रा-कळवा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. या मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले असून सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. संपूर्ण मतदारसंघातच चांगले मतदान झाले असल्याने कळवा-मुंब्र्यात घड्याळ धावणार की तुतारी वाजणार हे आता २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

मुंब्रा-कळवा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आव्हाड यांच्याविरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला तर मनसेकडून सुशांत सूर्यराव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात कळवा, अतिकोनेश्वर नगर, गावंदेवी, पारसिक नगर, खारेगाव, कौसा, मुंब्रा, रेतीबंदर असे अनेक भाग येतात. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी बऱ्यापैकी गर्दी केली होती. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ४७.३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. दुपारी काही वेळ मतदान केंद्रावर गर्दी कमी झाली मात्र त्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.

जितेंद्र आव्हाड हे यंदा चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १५ वर्षात केलेला विकास याचा चांगला फायदा आव्हाड यांना होण्याची चिन्हे असून मुस्लिम चेहरा म्हणून नजीब मुल्ला यांना मतदारांनी कितपत पसंती दिली आहे हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे मनसेचे सुशांत सूर्यराव यांनी देखील या मतदारसंघात चांगला जोर लावला होता. त्यामुळे राज ठाकरे यांचा या मतदार संघात किती प्रभाव पडतो हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र खऱ्या अर्थाने झालेल्या दुरंगी लढतीमुळे या मतदार संघात घड्याळ धावणार की तुतारी वाजणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टची चर्चा...

ठाणे : महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्रा-कळवा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी तिघांचेही आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो, असे म्हटले आहे. आव्हाड यांच्या या एक्स पोस्टमुळे नेमके त्यांना काय म्हणायचे आहे याबाबत आता राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघांचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे करतात. त्यामुळे नजीब मुल्ला यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याची रणनीती आखली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी