ठाणे

महाविकास आघाडी सरकार पाडण्याची पद्धतशीर व्यूहरचना

प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या तारखांची भविष्यवाणी भाजप नेत्यांकडून वेळोवेळी होती होती. कोरोना काळातही सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार संकटावर मात करत वाटचाल करत आहे, दरम्यान राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षातील आमदारांचा असंतोष उफाळून आला आणि मतदानात सत्ताधारी पक्ष आणि पाठिंबा देणारे अपक्ष यांनी विरोधात मतदान केल्याचे उघड होताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २५ ते ३० आमदारांना भाजप शासित राज्य असलेल्या गुजरातमध्ये हलवण्यात आले.

राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना चकवा देत महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी पद्धतशीर व्यूहरचना आखली गेली असल्याचे उघड झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असले तरी त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यावर विशेष प्रेम असल्याने जो नगरविकास विभाग कोणताही मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतो ते महत्वाचे खाते उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले . विशेष म्हणजे शिंदे हे गेली आठ वर्ष मंत्री असून त्यांचे शिवसेनेच्या बहुतांशी ग्रामीण आमदारांसोबत सलोख्याचे संबंध जुळले आहेत, नगरविकास मंत्री असल्याने त्यांनी आपल्या विभागातून ग्रामीण भागातील आमदारांच्या मार्फत नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आजही उद्धवांच्या समर्थक आणि आमदारांपेक्षा शिंदेच्या समर्थक आमदारांची संख्या जास्त असल्याचे चित्र सगळीकडे आहे.

दुसरीकडे शिवसेनेतील आमदारांवर शिंदे यांचा मोठा वरचष्मा असल्याने भाजपकडून अगदी सुरूवातीपासून करडी नजर होती, दरम्यान गेल्या काही वर्षापासून शिंदे हे नाराज असून ते भाजप सोबत जाणार असल्याची उघड चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरु होती, याची कुणकुण शिवसेना नेतृत्वालाही होती तरी शिवसेनेकडून पहिल्या पसंतीचे मंत्रीपद शिंदे यांना देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या मनाविरुद्ध झाल्याची तक्रार करताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या बदल्यांना तत्काळ स्थिगिती दिली. यावरून राज्याच्या राजकारणात शिंदे यांचे महत्व किती मोठे आहे हे वेळोवेळी उघड होत होते. शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व मोठे असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय निर्णय घेतांनाही शिंदे याना मोकळीक होती.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने

कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू