ठाणे

अंबरनाथ तालुक्यातील पर्यटनावर निर्बंध घालणारे आदेश मागे घेण्यात यावे - किसन कथोरे

प्रतिनिधी

पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर व बारवी डॅम परिसरात पर्यटनावर निर्बंध घालणारे आदेश मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. यासंदर्भात आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर परिसरातील धामनवाडी, तारवाडी, भोज, व-हाडे, दहिवली मळीचीवाडी हा परिसर व चांदप गावचे हद्दीत बारबी डॅम परीसरात बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते चारवी डॅम गेट नं. ३ येथील ३ कि.मी च्या परिसरात पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांत नाराजीचा सूर आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी या पावसाळी पर्यटनावरील बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.

पर्यटकांसाठी पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटनस्थळी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवता येऊ शकतो. यापूर्वी कोंडेश्वरला पर्यटक बुडण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

मात्र याठिकाणी एक बोट व चार पोहणारे लोक कायमस्वरूपी नेमून नागरिकांना पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. यादृष्टीने कोंडेश्वर, बारवी डॅम परिसर व इतरत्र पावसाळी पर्यटनावर घातलेली बंदी उठवावी, अशी आपली मागणी असल्याचे किसन कथोरे यांनी सांगितले.

पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळाला पाहिजे, हीच यामागची आपली भूमिका असल्याचे कथोरे यांनी सांगितले.

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!