ठाणे

फालकॉन हॉटेलवर पोलिसांचा छापा, २५ अटकेत

उल्हासनगर शहरातील उच्चभ्रू वर्गाचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या फालकॉन हॉटेलमध्ये मध्यरात्री पोलिसांनी जोरदार कारवाई करत जुगार खेळत असलेल्या २५ नामांकित जुगाऱ्यांना अटक केली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील उच्चभ्रू वर्गाचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या फालकॉन हॉटेलमध्ये मध्यरात्री पोलिसांनी जोरदार कारवाई करत जुगार खेळत असलेल्या २५ नामांकित जुगाऱ्यांना अटक केली आहे. उल्हासनगरमधील कल्याण-अंबरनाथ रोडवरील शांतीनगर परिसरातील या नामांकित हॉटेलमध्ये रात्री दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या खेळावर पोलिसांनी छापा मारून मोठा पर्दाफाश केला आहे.

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात हे जुगारी नियमितपणे हॉटेलमध्ये खोली बुक करून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल करीत होते.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी उघडपणे जुगार खेळण्याऐवजी हॉटेलच्या बंदिस्त खोलीत जुगार खेळण्याचा मार्ग निवडला. याच कारणास्तव फालकॉन हॉटेलचे दोन खास खोल्या क्रमांक ३०५ आणि ४०४ बुक करण्यात आल्या होत्या. यातील एक खोलीत १२ जण आणि दुसऱ्या खोलीत १३ जण तीन पत्ता खेळत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार खेळण्यासाठी हॉटेलमध्ये रोज खोली बुक केली जात होती. जुगाराच्या नफ्यातून नाश्ता, मद्य आणि कोंबडी पार्टींचीही व्यवस्था करण्यात येत होती. हॉटेल व्यवस्थापनाला दररोज हजारो रुपयांचा नफा होत असल्याने हॉटेलचे मालक आणि मॅनेजर या प्रकाराला प्रोत्साहन देत होते.

यावेळी मोहन जमटमल खत्री, उमेश दीपक गिधानी, मनीष प्रकाश आसनानी, भावेश भरत शौक़ीन, पवन टीकमदास शुक्रवाणी, कुमार किशन डॉर्डे, सुनील लखी रोहरा, नितेश श्यामलाल दाडा, हितेश लालचंद दूसेजा, गुरमीत सिंह लबाना यांच्यासह २५ जणांना अटक करण्यात आली. सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे करीत आहेत.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण