ठाणे

डोंबिवलीतील ५०० कुटुंबियांना पावसाचे पाणी भरण्याची वेळ ; भाजप करणार आंदोलन

शंकर जाधव

एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना धरणे भरले आहेत. मात्र नागरिकांना पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे चक्क पावसाचे पाणी भरण्याची वेळ आली आहे. गेले दीड महिने डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर येथील ५०० कुटुंबियांना पालिकेकडून होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील रहिवाशी पावसाचे पाणी भरत असून पिण्यासाठी पाणी विकत घेत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास २० जुलै रोजी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा भाजपने दिला आहे.

डोंबिवली पूर्वेला त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत गेली दीड महिने पालिकेकडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. येथील नागरिकांनी भाजपकडे आपली समस्या मांडल्यावर भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, राजू शेख यांनी पाणी पुरवठा डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांची भेट घेतली. मात्र वाघमारे यांनी लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले. पंधरा दिवस उलटूनही त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीला पाणी मिळत नसल्याने शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता वाघमारे यांची भेट घेऊन जाब विचारला. वाघमारे यांनी पुन्हा आश्वासन दिल्याने यावेळी मात्र आश्वासन नको, ५०० कुटुंबियांना पाणी द्या अशी मागणी केली.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष कांबळे म्हणाले, पावसाचे पाणी भरण्याची वेळ नागरिकांनी यावी हे सहन होण्यासारखे नाही. पाणी मिळणे हा नागीकांचा अधिकारी असून पालिका प्रशासन त्यांना या अधिकारापासून वंचित ठेऊ शकत नाही. या परिस्थितीला येथील अधिकारी व पाणी पुरवठा विभाग जबाबदार आहे. २० जुलै रोजी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. तर भाजपचे डोंबिवली शहर सचिव राजू शेख म्हणाले, आम्ही पंधरा दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता वाघमारे यांची भेट घेऊन ५०० कुटुंबियांना पाणी दिले जात नाही याबाबत जाब विचारला होता.

याबाबत पाणी पुरवठा डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत गेल्या आठ दिवसापासून पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. पाण्याच्या लाईनमध्ये दुरुस्तीचे काम सुरु असून दोन दिवसात येथील पाणी पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!