ठाणे

शिंदे-फडणवीस यांचे सरकार गतिमान - रविंद्र चव्हाण

वृत्तसंस्था

महाविकास आघाडी सरकार हे संथगतीने कार्य करीत होते, मात्र शिंदे-फडणवीस सरकार गतिमानतेने काम करीत असल्याचा प्रत्येय महाराष्ट्राला येत असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी डहाणू येथील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

पालघर जिल्ह्यात तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. पालघर जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकला पाहीजे. पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व कसे मिळवता येईल यासंदर्भात चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत चारोटी, तलासरी,या भागातील शिवसेना, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉ या पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार विलास तरे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा होती. ती आज त्यांच्या तेथील उपस्थितीतीने त्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे सांगितले जात आहे.

‘कॉमन मॅन’ चा द्वेषाला नकार

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, संजय निरुपम यांचा दावा

गँगरेपनंतर तलवारीनं कापली बोटे...बांसवाडा घटनेची हादरवून टाकणारी कहाणी, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

"नाहीतर देशातील हुकुमशाही सुरुच राहील..."खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका

लष्करातील जवानाने EVM मध्ये फेरफार करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले २.५ कोटी!