ठाणे

ठाणे स्थानकात उद्या रात्री ६ तासांचा पॉवर ब्लॉक, रात्री १०.३० ते पहाटे ४.३० पर्यंत गर्डर बसविण्याचे काम

Swapnil S

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात शनिवार २१ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहापासून रविवार २२ सप्टेंबरच्या पहाटे साडेचारपर्यंत पादचारी पूल गर्डर बसवण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

या ब्लॉकदरम्यान सहाव्या मार्गावर चालणाऱ्या मेल व एक्स्प्रेस गाड्या कल्याण-दिवा ते मुलुंड-विद्याविहार स्थानकांदरम्यान अप-जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या पॉवर ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेने प्रवास करणे टाळावे व सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे पूर्व येथील चेंदणी बंदर ते ठाणे पश्चिम यांना जोडणाऱ्या पुलाचे गर्डर बसविण्याचे काम मध्ये रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे.

ब्लॉकदरम्यान सुटणाऱ्या उपनगरीय सेवा आणि ठाणेकरिता वाशी येथून २१.३७ ते पनवेल येथून २३.१८ वाजेपर्यंत जाणाऱ्या उपनगरीय सेवा रद्द करण्यात आली आहे. तर डाऊन ट्रान्सहार्बर लाइनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे येथून २१.४१ वाजता सुटेल आणि वाशी येथे २२.१० वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाइनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून २१.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे २१.५३ वाजता पोहोचेल. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून ०५.१२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०६.०४ वाजता पोहोचेल.

अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून ०६.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०६.५९ वाजता पोहोचेल.

मेल व एक्स्प्रेसचे वेळापत्रक

सहाव्या मार्गावर चालणाऱ्या मेल व एक्स्प्रेस गाड्या कल्याण-दिवा ते मुलुंड-विद्याविहार स्थानकांदरम्यान अप-जलद मार्गावर वळवण्यात येतील. ११०७२ कामायनी, १११०० मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२०५२ मडगाव- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, ११०८२ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, २२१२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस, २२५३७ गोरखपूर-मुंबई कुशीनगर एक्स्प्रेस, ११०६२जयनगर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, १८०३० शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १८५१९ विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, २०१०४ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक; 'हे' Video केले अपलोड

जालन्यात एसटी बस-टेम्पोचा भीषण अपघात; बसच्या वाहकासह सहा जण ठार, १७ जखमी

‘मेट्रो-३’ला नवा मुहूर्त! पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेवेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार

मध्य रेल्वेत ज्येष्ठांसाठी मालडबा खुला करा; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

मराठा आरक्षणाचा वाद; राज्य सरकारला ‘तो’ अधिकार नाही - हाके