उल्हासनगर : उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या बाप-लेकाने एका पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत पीडित मुलीच्या शेजारी राहणारा नराधम आणि त्याचा बारा वर्षांचा मुलगा या दोघांनी मिळून या मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. मुलीचे आई-वडील कामावर गेल्यावर या नराधमांनी मुलीचा फायदा घेत अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.पीडित मुलगी बाथरूममध्ये गेल्यावर तिला झालेल्या त्रासाबद्दल तिच्या आईला सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.