प्रातिनिधिक छायाचित्र 
ठाणे

ठाण्याच्या खाडीला सलग सहा दिवस भरती येणार; खाडीकिनारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा, बघा भरतीचे वेळापत्रक

Swapnil S

ठाणे : येथे रविवारपासून पुढचे सलग सहा दिवस ठाण्याच्या खाडीला भरती येणार असून, यावेळी ४ मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुढचे काही दिवस ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रविवारपासून २७ जुलैपर्यंत ठाणे खाडीला भरती येणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी २४ जुलै रोजी जुलै महिन्यातील सर्वात मोठी भरती येणार असून, यावेळी ४.५४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

दरम्यान, मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये पुढचे काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर टीडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भरतीचे वेळापत्रक

दिनांक वार वेळ उंची (मीटर)

२२ सोमवार दु.२:३० ४.४०

२३ मंगळवार दु.३.१५ ४.२५

२४ बुधवार दु.३.४५ ४.५४

२५ गुरुवार सायं ४.३० ४.४७

२६ शुक्रवार सायं ५.१५ ४.३१

२७ शनिवार सायं ६.०० ४.०८

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला