ठाणे

Thane Metro : ठाणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा संपणार! प्रत्यक्ष सेवा 'या' महिन्यापासून सुरू होणार? एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती

वाहतूककोंडीच्या कटकटीतून ठाणेकरांची लवकरच सूटका होणार आहे. मेट्रो प्रवासाचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर...

Krantee V. Kale

वाहतूककोंडीच्या कटकटीतून ठाणेकरांची लवकरच सूटका होणार आहे. मेट्रो प्रवासाचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुढील महिन्यात होणार चाचणी

ठाण्यातील बहुप्रतीक्षित मेट्रो सेवेची चाचणी पुढील महिन्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू असून यावर्षी डिसेंबरपर्यंत तिचे पूर्ण कामकाज सुरू होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली. ठाणे वर्षा मॅरेथॉनचे उद्घाटन केल्यानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते.

डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याची योजना

ठाण्यात मेट्रोची चाचणी सप्टेंबरमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याचे योजिले आहे. त्यासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मेट्रो ४ मार्गिकेवर ३२ स्थानके, काम ८४.५ टक्के काम पूर्ण

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुमारे ८४.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील घाटकोपर पूर्व भागातील पंतनगर-घाटकोपर बस स्थानकावर स्टील स्पॅन यशस्वीरीत्या बसविण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश आले आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची आहे. या मार्गिकेवर ३२ स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे १४ हजार ५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एकूण पाच पॅकेजमध्ये या मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली. एमएमआरडीएच्या २०२० मधील नियोजनानुसार ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊन आणि अन्य कारणाने प्रकल्पाचे काम काहीसे संथ झाले होते. त्यातच मेट्रो ४ मार्गिकेच्या ‘पॅकेज ८’, ‘पॅकेज १०’ आणि ‘पॅकेज १२’चे काम काही महिन्यांपासून बंद होते. कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याचा फटका मेट्रो मार्गिकेच्या कामाला बसला. त्यातून प्रकल्पाचे काम रखडले होते. या कामाला पुन्हा एमएमआरडीएने गती दिली आहे. सध्या या मार्गिकेचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार घाटकोपर पूर्व भागातील पंतनगर-घाटकोपर बस स्थानकावर स्टील स्पॅन उभारण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. ते रविवारी पहाटे पूर्ण झाले.

४५० टन वजनचा स्पॅन

४५० टन वजनच्या स्पॅनची लांबी ५८ मीटर, उंची ३.१ मीटर, वजन ४५० टन आहे. त्या स्पॅनला एकूण ५ स्टील गर्डर आहेत.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?