ठाणे

Thane : कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिका शुल्क आकारणार

ठाणे शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकेने मोठ्या गृहसंकुलांना कचऱ्याची विल्हेवाटीसाठी शुल्क आकारणीसाठी तयारी सुरू केली आहे. १०० किलोग्रॅमपेक्षा अधिक कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या गृहसंकुलांचा महापालिकेने सर्व्हे सुरू केले असून सध्या ६७१ गृहसंकुल आणि ७० वाणिज्य आस्थापनांचा तपास केला जात आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकेने मोठ्या गृहसंकुलांना कचऱ्याची विल्हेवाटीसाठी शुल्क आकारणीसाठी तयारी सुरू केली आहे. १०० किलोग्रॅमपेक्षा अधिक कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या गृहसंकुलांचा महापालिकेने सर्व्हे सुरू केले असून सध्या ६७१ गृहसंकुल आणि ७० वाणिज्य आस्थापनांचा तपास केला जात आहे.

महापालिकेच्या घनकचरा विभागाने आधीच ओला आणि सुका कचरा विल्हेवाटीसाठी सूचना दिल्या आहेत. ज्या आस्थापनांनी या सूचनांचे पालन केले नाही, त्यांचे कचऱ्याचे व्यवस्थापन महापालिकेने स्वत:च्या हाती घेऊन त्याचे शुल्क वसूल केले जाईल, असे इशाराही दिले गेले आहे. केंद्र सरकारच्या सहा वर्षांपूर्वीच्या आध्यादेशानुसार, १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याचे निर्माण करणाऱ्या आणि ५ हजार स्केअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सोसायटीने कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी विल्हेवाट करणे अनिवार्य आहे. महापालिका म्हणते की, कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट सुनिश्चित करण्यासाठी आता हक्काचे डम्पिंग सेंटर सुरू केले जात आहेत, जे भविष्यातील कचऱ्याच्या समस्या टाळण्यास मदत करतील.

राजकीय अडथळ्यांमुळे योजना रखडल्या

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी ४२५ गृहसंकुलांना नोटीस बजावल्या होत्या; मात्र राजकीय अडथळ्यांमुळे योजना पूर्णत: राबवता आलेली नाही. आता नव्या सर्व्हेत ७४१ गृहसंकुल व आस्थापनांचा समावेश आढळला असून त्यांची विल्हेवाट प्रक्रिया तपासली जाणार आहे.

लहान मुलांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अलर्ट! ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी; नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

अमेरिकेत आणखी एक भारतीय ठार; डलासमध्ये विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; 'या' दिवसांमध्ये बाहेर पडताना घ्या काळजी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन