प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नव्याने अंथरण्यात आलेली ११६८ मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नव्याने अंथरण्यात आलेली ११६८ मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या कामासाठी नितीन कंपनी जंक्शन येथे ७५० मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शनिवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजेपासून ते रविवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत म्हणजेच एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या शटडाऊन कालावधीत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रुपादेवी जलकुंभ, रुपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ आणि लोकमान्य जलकुंभ या जलसाठ्यांखालील सर्व परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO

Mumbai : सभागृहातील आसन व्यवस्था उत्कृष्ट; तीन वर्षांत एकही तक्रार नाही

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; सावंतवाडी रोड स्थानकावर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा