ठाणे

वकिलाला मारहाण करून लुटणारे टोळके गजाआड

हरदिप उर्फ हनी लबाना याने त्याच्या हातातील कडयाने कृपलानी यांना मारहाण करून जखमी केले.

वृत्तसंस्था

वकिलाकडे पैशांची मागणी केली, त्याने नकार दिल्यावर सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत पळ काढला होता. या टोळक्याला मध्यवर्ती पोलिसांनी गजाआड केले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवसायाने वकील असलेले अरुण कृपलानी हे डर्बी हॉटेल जवळून जात होते. त्यावेळी त्यांना हरदिप उर्फ हनी अजयसिंग लबाना व त्याचा साथीदार यांनी अडवले. कृपलानी यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून हरदिप लबाना याने इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनतर हरदिप उर्फ हनी लबाना याने त्याच्या हातातील कडयाने कृपलानी यांना मारहाण करून जखमी केले.

अरुण यांच्याबरोबर असलेला मनीष गोस्वामी हे घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असल्याचे पाहून हरदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मनिषला ठोश्याबुक्यांनी मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला. तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातून ८०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हरदिप आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीराम राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे, पोलीस हवालदार विजय जिरे, दत्तू जाधव, प्रवीण पाटील, पोलीस नाईक दिपक पाटील, पोलीस शिपाई बाबासाहेब ढाकणे, अरविंद पवार, ढमाले यांच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तात्काळ गुन्हयातील आरोपी साहील उर्फ धनराज सुभाष गुहेर, कमल महेश कजानीया यांना अटक करून गुन्हयातील रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

हरदीप उर्फ हनीसिंग अजयसिंग लबाना, हरविंदर उर्फ चिंकु अजयसिंग लबाना या दोघाना इमलीपाडा फॉरवरलेन येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश