ठाणे

ठाणे जिल्ह्यातील मत टक्का ५० टक्क्यावरच

Maharashtra assembly elections 2024 ; मतदानाचा टक्का किमान ७५ टक्क्यांवर घेऊन जाण्याचा चंग ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी बांधला होता, त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. मात्र इतकं करूनही मतदार राजा काही पावला नाहीच.

Swapnil S

ठाणे : मतदानाचा टक्का किमान ७५ टक्क्यांवर घेऊन जाण्याचा चंग ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी बांधला होता, त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. मात्र इतकं करूनही मतदार राजा काही पावला नाहीच. सकाळी धीम्या गतीने झालेली सुरवात ११ वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढलेली दिसली. मात्र त्यानंतर ती पुन्हा ओसरत गेली. त्यामुळे दिवसाखेर जिल्ह्याचे मतदान सरासरी ५० टक्क्यांपर्यंत राहिले.

मागील अनेक निवडणुकांचा मतदानाचा टक्का हा ५० टक्क्यांच्या आसपास घुटमळत असल्याचे पहावयास मिळाले. या विधानसभा निवडणुकीतही हे मतदान ७५ टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचा चंग जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बांधला होता. त्यासाठी विविध योजना, विविध युक्त्या योजल्या होत्या.

मात्र इतकं करूनही मतदार राजा केंद्रापर्यंत पोहचला नाही. तर चोख व्यवस्था करूनही अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीन नादुरुस्त, मंद चालत होत्या. तर काही केंद्रावरील कर्मचारी विनाकारण टंगळमंगळ करत असल्याने केंद्राबाहेर गर्दी वाढलेली दिसली. त्यामुळे नाराज झालेले मतदार मतदान न करताच रांगेतून बाहेर पडून निघून गेले. या आणि अशा अनेक कारणांमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा ७५ टक्क्यांचा प्रयत्न अपुरा पडला.

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत