(प्रातिनिधिक छायाचित्र) 
ठाणे

विद्यार्थ्यांचे समायोजन अडचणीत; ‘फी ‘मुळे पालकांचे कंबरडे मोडणार

महापालिका हद्दीतील अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे समायोजन इतर शाळांमध्ये करण्याचा स्तुत्य निर्णय शिक्षण विभागाने घेतला असला तरी या निर्णयामुळे पालकांच्या अडचणी वाढणार आहेत.

Swapnil S

ठाणे : महापालिका हद्दीतील अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे समायोजन इतर शाळांमध्ये करण्याचा स्तुत्य निर्णय शिक्षण विभागाने घेतला असला तरी या निर्णयामुळे पालकांच्या अडचणी वाढणार आहेत. नवीन शाळेत प्रवेश घेताना त्या शाळेची वार्षिक शैक्षणिक फीचे ओझे पालकांना परवडणार का? हा प्रश्न आहे. जर फी भरली नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील अनाधिकृत असलेल्या ८१ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन शिक्षण विभागाने करण्याचे निश्चित केले असले तरी देखील ज्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना धाडण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून हाती घेण्यात आला आहे. त्या शाळांची फी त्या विद्यार्थ्यांना परवडणार का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे. किंबहुना त्यांच्या पालकांना ती फी भरणे शक्यच होणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जात असते. परंतु त्यावर योग्य ती कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थी आजही शिक्षण घेताना दिसत आहेत. परंतु यंदा महापालिकेच्या शिक्षण विभागाने अशा शाळांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची देखील यादी जाहीर केली आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या शाळा बंद करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न असणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८१ अनधिकृत शाळा असून त्यात १९७०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे इतर अधिकृत खासगी शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. यासाठी त्यांनी शाळा प्रशासनासोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकानंतर १९ खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची तयारी दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे चित्र होते. परंतु बेकायदा शाळेतील शुल्कापेक्षा या शाळांचे शुल्क जास्त असून ते परवडण्याजोगे नसल्याने पालकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

अनेकांची अधिकृत घर घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसते. त्याचाच फायदा भूमाफिया घेतात आणि त्यांना बेकायदा बांधकामांमध्ये स्वस्त दरात घरे विकून त्यांची फसवणूक करतात. असाच प्रकार आता शाळांच्या बाबतीतही समोर आला आहे.

बेकायदा शाळांकडून कमी शुल्क आकारणी

अधिकृत शाळांचे शुल्क हे जास्त असते. अनेकांना ते परवडत नाही. त्याचा फायदा घेऊन काहीजण बेकायदा शाळा उभारून त्यात कमी शुल्क ठेवतात. त्यामुळे अशा शाळांमध्ये पालक विद्यार्थ्यांचा प्रवेश घेत आहेत. मात्र, कोणत्याही परवानगीविना चालवित असलेल्या या शाळांचालकांकडून पालकांची फसवणूक होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

दिवा ६५

मुंब्रा ०८

माजिवडा-मानपाडा ०३

कळवा ०३

उथळसर ०२

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

मुंबईत आतापर्यंत 'फक्त' सव्वा लाख दुबार मतदार; BMC च्या शोध मोहिमेतून समोर

नव्या राजकीय पक्षात प्रवेश, निवडणूक मात्र मूळ पक्षाच्या चिन्हावरच; पक्षांतर केलेल्या ६ माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? सरसंघचालक भागवत म्हणाले, "हा निर्णय...