नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!

Holi Wishes in Marathi : या होळीला प्रेम, आनंद आणि सकारात्मकतेचे रंग सर्वांपर्यंत पोहोचवा. खाली दिलेल्या सुंदर मराठी शुभेच्छा कॉपी करा आणि आपल्या प्रियजनांना पाठवा आणि सणाचा आनंद अधिक रंगतदार बनवा!
नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!
नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!
Published on

हिंदू संस्कृतीत होळी हा आनंद, उत्साह आणि एकतेचा सण मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. होळीच्या पवित्र अग्नीत नकारात्मक विचार, मत्सर आणि द्वेष जाळून टाकण्याचा संदेश दिला जातो, तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचे नवे रंग भरले जातात.

आजच्या डिजिटल युगात सण साजरा करण्याची पद्धतही बदलली आहे. दूर असलेले मित्र-परिवार यांच्यापर्यंतही आपण काही क्षणांत आपल्या भावना पोहोचवू शकतो. मनापासून लिहिलेल्या मराठी शुभेच्छा WhatsApp, Facebook किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवल्या तर सणाचा आनंद द्विगुणित होतो.

म्हणूनच या होळीला प्रेम, आनंद आणि सकारात्मकतेचे रंग सर्वांपर्यंत पोहोचवा. खाली दिलेल्या सुंदर मराठी शुभेच्छा कॉपी करा आणि आपल्या प्रियजनांना पाठवा आणि सणाचा आनंद अधिक रंगतदार बनवा!

नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!
Holi Special : लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत

होळी दरवर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा... साजरा करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!
Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय

प्रेम रंगाने भरा पिचकारी, आपुलकीचे सारे रंग उधळू द्या... या रंगांना माहीत नाहीत ना जाती ना बोली
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगांमध्ये रंगून जाण्याआधी... तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू... प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू... अग्नित नकारात्मकता जाळू रे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!
Chandra Grahan 2026: वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ३ मार्चला; आकाशात 'ब्लड मून'चा देखावा, विदर्भात सर्वाधिक वेळ दर्शन

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता... करू होम दु:खाचा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आली रे आली, होळी आली... चला आज पेटवूया होळी, नैराश्याची बांधून मोळी... पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूया!
होळी रे होळी! हार्दिक शुभेच्छा!

जळो सर्व दोष, जळो सर्व ईर्ष्या... चंद्रासारखे असावे मन, सुंदर असावे जग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रार्थना आहे की ही होळी तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी आनंदाची, यशाची आणि समृद्धीची जावो
रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नात्यांमध्ये भरू द्या प्रेमाचे गोंडस रंग; WhatsApp, Facebook वर शेअर करा खास मराठी संदेश; कॉपी करा आणि लगेच पाठवा!
Thane : होळी-धुलिवंदन पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच ?

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा, हिरवा गुलाबी गुलालाचा... पिचकारीत भरून सारे रंग रंगवूया एकमेकांना!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी पेटू दे, रंग उधळू दे, द्वेष जळू दे... अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या या शुभ प्रसंगी, तुमच्या जीवनाचा कॅनव्हास आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो
होळीच्या शुभेच्छा!

इंद्रधनुच्या रंगांसोबत पाठवल्या आहेत शुभेच्छा... प्रेम, आनंद आणि उल्हासाचा वर्षाव होवो!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

logo
marathi.freepressjournal.in