@colorsmarathi/ Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: निक्की झाली ‘आई’, घरात आलेल्या दोन छोट्या पाहुण्यांसोबत रंगणार आजचा एपिसोड

Nikki Tamboli: 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घरात पहिल्यांदाच दोन छोट्या पाहुण्यांची एन्ट्री झालेली पाहायला मिळेल.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 16 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाला असून गेल्या १५ दिवसांत घरातील सर्व सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वच सदस्य एकापेक्षा एक असल्याने त्यांनी 'बिग बॉस मराठी'चं घर डोक्यावर घेतलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घरात पहिल्यांदाच दोन छोट्या पाहुण्यांची एन्ट्री झालेली पाहायला मिळेल.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच पाहुणे येणार आहेत". त्यानंतर घरात दोन बाहुल्यांची एन्ट्री झालेली दिसून येते. बाहुल्यांना पाहून घरातील सर्व सदस्य आनंदीत होतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. एका बाहुल्याला निक्की घेते, तर एका बाहुल्याला जान्हवी घेते. त्यानंतर निक्की पुढे घन:श्यामला विचारते,"तू मामा आहेस ना". घन:श्यामही निक्कीला उत्तर देत "हो..मी मामा आहे", असं म्हणतो. त्यावर निक्की पुढे म्हणते,"बाळ माझ्यासारखं आहे". त्यानंतर निक्कीला 'बिग बॉस' म्हणतात,"निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS". त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.

निक्कीनच्या समानावरून वैभव आणि पॅडीमध्ये जुंपली

निक्कीने ठेवलेल्या सामानाला पॅडीने हात लावल्याने वैभव आणि पॅडीमध्ये चांगलीच जुंपली आहे. आजच्या भागात वैभव पॅडीला म्हणतोय,"निक्कीचं सामान आहे...ती हात लावेल. तुम्ही दहावेळा सांगितलं असतं तर तुमच्या पेशनचं कौतुक झालं असतं". दुसरीकडे निक्की म्हणते,"मी १०० दिवस माझं सामान तिथेच ठेवणार".

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत