Samantha Ruth Prabhu : समांथा-राजच्या घरी हलला पाळणा; बाळाचा पहिला फोटो पोस्ट करत नावही केलं जाहीर  (Photo - Instagram)
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu : समांथा-राजच्या घरी हलला पाळणा; बाळाचा पहिला फोटो पोस्ट करत नावही केलं जाहीर

समांथा आणि राज यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली होती. मोजक्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि चित्रपट दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले असून समांथाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांच्या घरी बाळाचे आगमन झाले. ही आनंदाची बातमी समांथा आणि राज यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या मुलाचे नावही जाहीर केले असून त्याची पहिली झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टनंतर चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुलाचं नाव जाहीर

समांथा आणि राज यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघांनीही आपल्या चिमुकल्या बाळाची छोटीशी बोटे हातात धरल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी मुलाचे नाव 'देव निदिमोरू' असल्याचे जाहीर केले.

'आमचा गोड मुलगा देव निदिमोरू. १९.११.२०२६. आमच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे,' अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे. ३९ वर्षीय समांथाने ही आनंदाची बातमी शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून दोघांचे अभिनंदन केले. वरुण धवन, अनन्या पांडे आणि रकुल प्रीत सिंह यांसारख्या कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

समांथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू यांचे लग्न

समांथा आणि राज यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात एका खासगी समारंभात लग्नगाठ बांधली होती. मोजक्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

राज निदिमोरू याचे यापूर्वी श्यामली डे हिच्याशी लग्न झाले होते. तर समांथाचे पहिले लग्न अभिनेता नागा चैतन्य याच्याशी झाले होते. जवळपास चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर २०२१ मध्ये सामंथा आणि नागा चैतन्य यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

'द फॅमिली मॅन २'च्या सेटवर झाली पहिली भेट

समांथा आणि राज यांची पहिली भेट 'द फॅमिली मॅन २' या वेब सीरिजच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या सीरिजमध्ये समांथाने 'राजी' नावाच्या बंडखोर महिलेची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते. यानंतर दोघे 'सिटाडेल : हनी बनी' या वेब सीरिजच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. त्यांच्या व्यावसायिक सहवासातून जवळीक वाढल्याचे वृत्त आहे. लग्नापूर्वी दोघांनीही आपले नाते बहुतांश काळ खासगी ठेवले होते.

जून २०२६ मध्ये समांथाने 'मा इंटी बंगाराम' या चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या गरोदरपणाची माहिती दिली होती. त्यानंतर चाहत्यांना तिच्या बाळाच्या आगमनाची उत्सुकता होती. अखेर आता समांथा आणि राज यांनी आपल्या लेकाचा पहिला फोटो पोस्ट करत करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

WhatsApp Update : व्हॉट्सॲप युजर्ससाठी गुड न्यूज! आता एका ग्रुपमध्ये तब्बल १,५०० जणांना करता येणार अ‍ॅड, वाचा सविस्तर

Mumbai : भांडुपच्या नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करा; अभिजीत बांगर यांचे आदेश

Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात

Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ

SpiceJet च्या अडचणीत वाढ; विमान रद्द केल्याप्रकरणी DGCA चा दणका, नियमभंगाच्या आरोपांवर नोटीस जारी