Akshaya Tritiya 2026 : सोने खरेदी करताय? 'या' टिप्स लक्षात ठेवा आणि फसवणूक टाळा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Akshaya Tritiya 2026 : सोने खरेदी करताय? 'या' टिप्स लक्षात ठेवा आणि फसवणूक टाळा

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना हॉलमार्क, मेकिंग चार्जेस, वजन आणि बिल यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

किशोरी घायवट-उबाळे

अक्षय्य तृतीया म्हणजे सोने खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी दागिने किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, सोने खरेदी करताना थोडासा निष्काळजीपणा देखील महागात पडू शकतो. फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य किंमतीत शुद्ध सोने मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

हॉलमार्क तपासायलाच हवा

सोने खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉलमार्क. Bureau of Indian Standards (BIS) कडून दिलेला हॉलमार्क सोन्याची शुद्धता दर्शवतो. त्यामुळे शक्यतो हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करा. १८, २२ आणि २४ कॅरेट अशा वेगवेगळ्या शुद्धतेमध्ये सोने उपलब्ध असतं.

मेकिंग चार्जेसवर चर्चा करा

दागिन्यांच्या किमतीत मेकिंग चार्जेसचा मोठा वाटा असतो. काही वेळा हे शुल्क एकूण किमतीच्या २० ते ३० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे दागिने घेताना मेकिंग चार्जेसबाबत नक्की चर्चा करा आणि शक्य असेल तिथे ते कमी करून घ्या.

सोन्याच्या भावावर लक्ष ठेवा

सोने खरेदी करण्यापूर्वी बाजारातील दर तपासणं आवश्यक आहे. सध्याचे भाव, वाढ-घट याबाबत माहिती घेतल्यास योग्य वेळी खरेदी करता येते. विविध ज्वेलर्सकडे दरांची तुलना केल्यास चांगला निर्णय घेता येतो.

बिल घ्यायला विसरू नका

सोने खरेदी केल्यानंतर बिल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बिलामध्ये दागिन्यांचं वजन, शुद्धता आणि दर यांची माहिती असते. भविष्यात सोने विकताना किंवा गहाण ठेवताना हे बिल उपयोगी ठरतं. बिल नसल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.

सोन्याचं वजन तपासा

सोने खरेदी करताना त्याचं वजन अचूक आहे का हे नक्की तपासा. कारण सोन्याची किंमत जास्त असल्यामुळे अगदी छोटासा फरकही महागात पडू शकतो. विश्वासार्ह ज्वेलरकडूनच खरेदी करणं अधिक सुरक्षित ठरतं.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदी करताना थोडी जागरूकता ठेवली, तर फसवणूक टाळता येईल आणि योग्य गुंतवणूकही करता येईल. हॉलमार्क, बिल, दर आणि वजन या गोष्टींची खात्री करूनच सोने खरेदी करणं फायद्याचं ठरेल.

Mumbai : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; कोणत्या भागांवर परिणाम? वाचा सविस्तर

सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात २% वाढ मंजूर, ८व्या वेतन आयोगाची शक्यता

अदानींनी अंबानींना मागे टाकले; गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटींचे विमा संरक्षण; मॅरिटाइम फंडला केंद्र सरकारची मंजुरी

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण