लाईफस्टाईल

नॉन-स्टिक की लोखंडी? स्वयंपाकासाठी भांडी निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

नॉन-स्टिक भांड्यांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत असताना कास्ट आयर्न, माती, तांबे, काच आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचे फायदे आणि वापर जाणून घ्या.

Mayuri Gawade

स्वयंपाकघरात भांड्यांची निवड करताना आपण त्यांच्या किंमतीपासून ते वापरायला किती सोपी आहेत, याचा विचार करतो. त्यामुळे अन्न चिकटू नये म्हणून नॉन-स्टिक भांड्यांना अनेकांची पसंती असते. मात्र, भांड्यांवरील कोटिंग आणि त्याची झीज यामुळे नॉन-स्टिकच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी तुलनेने योग्य पर्याय कोणते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आरोग्याच्या दृष्टीने पाहता, आहारासोबतच अन्न कोणत्या भांड्यात शिजवलं जातं याचाही स्वयंपाकाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. कास्ट आयर्न, माती, तांबे, काच आणि स्टेनलेस स्टील यांसारखे पर्याय स्वयंपाकघरात उपयोगी ठरू शकतात. मात्र, प्रत्येक धातूचा वापर योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे.

कास्ट आयर्नची भांडी

कास्ट आयर्न म्हणजेच लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्यास अन्नात काही प्रमाणात लोह मिसळू शकतं. त्यामुळे अशा भांड्यांचा वापर काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, टोमॅटो, लिंबू किंवा इतर अतिआम्लीय पदार्थ जास्त वेळ शिजवू नयेत.

मातीची भांडी

मातीच्या भांड्यात मंद आचेवर केलेल्या स्वयंपाकाला वेगळी चव येते. माठात ठेवलेलं पाणीही नैसर्गिकरित्या थंड राहतं. मात्र स्वयंपाकासाठी वापरण्यापूर्वी भांडे अन्नासाठी सुरक्षित आणि योग्य प्रकारे तयार केलेलं आहे का, हे तपासणं आवश्यक आहे.

तांब्याची भांडी

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्याची पद्धत जुनी आहे. मात्र तांब्याच्या भांड्यात थेट आम्लयुक्त पदार्थ ठेवणे किंवा शिजवणे टाळावे. भांडे नियमित स्वच्छ ठेवणंही महत्त्वाचं आहे.

काच आणि स्टेनलेस स्टील

पाणी किंवा अन्न ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या तुलनेत काच आणि स्टेनलेस स्टीलची भांडी हा सोयीचा पर्याय ठरू शकतो. विशेषतः गरम अन्न किंवा पेय प्लास्टिकमध्ये साठवणे टाळणे चांगले.

थोडक्यात, एकाच प्रकारची भांडी प्रत्येक स्वयंपाकासाठी सर्वोत्तम असतीलच असं नाही. पदार्थाचा प्रकार, भांड्याची गुणवत्ता आणि त्याचा योग्य वापर याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत

Mumbai : 'आता आम्हाला आई-बाबा कोण म्हणणार?'; वांद्र्यात न्युट्रिशनिस्टच्या कारने ८ वर्षीय चिमुरड्याला चिरडले, पालकांचा आक्रोश

Mumbai : 'मीटर रीडिंग अपडेट करा' म्हणत पाठवली फेक APK फाईल; ६.२५ लाखांचा गंडा, अशा फ्रॉडपासून तुम्ही कसे वाचाल?

Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार