What are the signs and symptoms of vitiligo Freepik
लाईफस्टाईल

World Vitiligo Day 2024: कोड आजार स्पर्शाने पसरतो का? जाणून घ्या लक्षणं

Symptoms of Vitiligo: विटिलिगो अर्थात कोड या आजराबद्दल अनेक गैरसमज आहेत. हा त्वचा रोज स्पर्शाने पसरतो असेही अनेकांचे मत आहे.

Tejashree Gaikwad

What is Vitiligo: विटिलिगो किंवा कोड या आजाराबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हा एक असा त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर पांढरे डाग येतात. ही एक त्वचेशी संबंधित समस्या आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की कोड झालेल्या लोकांना स्पर्श केला तर त्यांनाही कोड होईल. या आजाराबद्दल असे अनेक गैरसमज आहेत. हेच गैरसमज दूर करण्यासाठी आणि जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी जागतिक विटिलिगो दिन दरवर्षी २५ जून रोजी साजरा केला जातो.

काय आहे कोड आजार?

कोड किंवा विटिलिगो हा जगातील सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे. वैद्यकीय भाषेत पांढऱ्या डागांना कोड म्हणतात. हा एक प्रकारचा त्वचारोग आहे, ज्यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचेचा रंग पांढरा होऊ लागतो. यामध्ये त्वचेचा रंग एकदमच बदलत नाही तर हळूहळू रंग बदलत जातो. हळूहळू हे डाग वाढू लागतात आणि संपूर्ण शरीरावर पसरतात.

काय आहेत लक्षणं?

  • शरीरावर हलके पिवळे किंवा गुलाबी डाग दिसणे.

  • या डागांच्या आजूबाजूच्या केसांचा रंगही पांढरा होऊ लागतो.

  • त्या ठिकाणी जळजळ झाल्याची भावना

  • साधारणपणे हात, चेहरा अशा उघड्या भागांवर हे डाग दिसू लागतात.

  • हे सहसा २० वर्षांच्या आधी दिसून येते.

  • आजारामागची कारणे काय आहेत?

  • मेलेनोसाइट्सच्या कमतरता

  • कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली

  • कधीकधी बुरशीजन्य संसर्ग

  • ल्युकोडर्मा हे देखील याचे प्रमुख कारण मानले जाते

  • पोषक तत्वांच्या कमतरता

कोड आजार स्पर्शाने पसरतो का?

कोड हा त्वचेचा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. हा रोज त्वचारोग कोणालाही होऊ शकतो. जर हा आजार कोणाला असेल तर त्याची लक्षणे वयाच्या २० वर्षापर्यंत दिसून येतात.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा