How to Make Bread Poha: सकाळच्या घाईत काय नाश्ता बनवायचा हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. रोजचेच रेगुलर पदार्थ खाऊनही कंटाळा येऊ लागतो. मग अशावेळी शोध सुरु होतो तो नवीन रेसिपीचा. अशी रेसिपी जी झटपट तयार पण होईल आणि खायला मज्जा पण येईल. तुम्हीही अशाच गोंधळात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक मस्त रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला नाश्त्याची जी रेसिपी सांगणार आहोत ती ब्रेडपासून तयार केली जाते आणि त्याची चव पोह्यासारखी लागते. ही रेसिपी आहे ब्रेडचे पोहे. होय, तुम्ही बरोबर वाचले. तुम्ही ब्रेडपासून पोहे सहज बनवू शकता. चला याची झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
२ टीस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
मूठभर कढीपत्ता
४ स्लाईस ब्रेड
१ कांदा
२ टोमॅटो
१ टीस्पून तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून जिरेपूड
१ चमचा धने पावडर
चवीनुसार मीठ
१ चमचा कोथिंबीर
जाणून घ्या कृती
> सर्व प्रथम, ब्रेड घ्या आणि त्याचे चौकोनी तुकडे करा. (जास्त पोहे बनवायचे असल्यास जास्त ब्रेड घेऊ शकता.)
> नंतर गॅस चालू करा आणि त्यावर कढई ठेवा.
> कढई गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून गरम होऊ द्या.
> काही वेळानंतर बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा सोनेरी होईपर्यंत शिजवा.
> कांदा सोनेरी झाल्यावर त्यात २ बारीक चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
> आता टोमॅटो चांगले शिजल्यावर त्यात १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून जिरेपूड, १ टीस्पून धनेपूड, चवीनुसार मीठ घाला.
> हे सर्व मसाले नीट मिक्स करून २-३ मिनिटे शिजवा. ठरलेल्या वेळेनंतर, पाणी आणि तेल घालून ते कोरडे होईपर्यंत शिजवा.
> शेवटी ब्रेडचे तुकडे घाला आणि ते चांगले मिसळा. तुमचे गरम गरम ब्रेडचे पोहे तयार आहेत.