(Photo-@SanjeevKapoor)
लाईफस्टाईल

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवा पौष्टिक राजगिरा थालीपीठ; वाचा स्पेशल रेसिपी

राजगिरा हा प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असल्यामुळे उपवासासाठी उत्तम पर्याय मानला जातो.

किशोरी घायवट-उबाळे

महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासात शरीराला ऊर्जा देणारे आणि पचायला हलके अन्न खाणे आवश्यक असते. राजगिरा हा प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असल्यामुळे उपवासासाठी उत्तम पर्याय मानला जातो. राजगिरा थालीपीठ ही चविष्ट, पौष्टिक आणि पटकन बनणारी रेसिपी आहे.

साहित्य :

  • राजगिरा पीठ - १ कप

  • उकडलेला बटाटा (मॅश केलेला) - १

  • हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या) - २

  • शेंगदाणा कुट - २ चमचे

  • सैंधव मीठ - चवीनुसार

  • कोथिंबीर

  • तूप किंवा तेल -भाजण्यासाठी

  • पाणी - आवश्यकतेनुसार

कृती :

एका भांड्यात राजगिरा पीठ घ्या. त्यात उकडलेला बटाटा मिरची, शेंगदाणा कुट, मीठ आणि कोथिंबीर घाला. थोडे थोडे पाणी घालून सॉफ्ट पीठ मळा. प्लास्टिक शीट किंवा केळीच्या पानावर थालीपीठ थापा. तवा गरम करून तूप किंवा तेल घाला. थालीपीठ तव्यावर टाका आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.

टिप्स :

  • पीठ जास्त पातळ करू नका त्यामुळे थालीपीठ तुटू शकते.

  • तूप वापरल्यास थालीपीठ जास्त चविष्ट लागते.

  • गरम दही किंवा उपवास चटणीसोबत सर्व्ह करा.

  • शेंगदाणा कुट घातल्याने प्रोटीन आणि टेस्ट वाढते.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल