महाराष्ट्र

येत्या २४ तासात मराठी भाषिकांवर होणारे हल्ले थांबले नाही तर... - शरद पवार 

प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारचे वागणे आणि वक्तव्यांमुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला झाला असून महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४ तासांत कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील आणि मराठी भाषिक लोकांवर हल्ले करणे आणि त्रास देणे थांबवले नाही तर परिस्थिती आणखीनच वाढू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

Maharastra Karnataka Border issue : महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटला; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला

बेळगाव, कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला, गाड्या थांबवण्यात आल्या. तसेच बेळगावसह इतर मराठी भाषिक भागात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे बांध फुटत आहेत. या सर्व मुद्द्यावर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ज्यांनी देशाला संविधान दिले. महान महात्म्यच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर जे घडले ते निषेधार्ह आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काही आठवड्यांपासून हे प्रकरण वेगळ्या रूपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत.



दरम्यान असे चित्र निर्माण होत असताना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची गरज होती. देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला मात्र काही उपयोग झाला नाही. येत्या 24 तासांत वाहनांवर होणारे हल्ले थांबले नाही तर आम्ही पण संयम पाहणार नाही, या परिस्थितीची जबाबदारी कर्नाटक सरकारवर राहील, असा इशारा शरद पवार यांनी दिला. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रक्षोभक भूमिका घेतली जात आहे. सहकाऱ्यांकडून हल्ले होत आहेत. देशाच्या एकात्मतेला हा मोठा धक्का आहे. तेच काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप