महापौर बंगल्यासाठी पैसे, पण बेस्टला नाहीत; आदित्य ठाकरेंची सत्ताधारी पक्षावर टीका संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : महापौर बंगल्यासाठी पैसे, पण बेस्टला नाहीत; आदित्य ठाकरेंची सत्ताधारी पक्षावर टीका

महापौर बंगल्यातील नूतनीकरण, दुरुस्ती यावर साडेतीन कोटींचा खर्च करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडे पैसा आहे. मात्र बेस्ट उपक्रमाला देण्यासाठी पैसे नाहीत, अशी टीका युवासेना आदित्य ठाकरे यांनी केली.

Swapnil S

मुंबई : महापौर बंगल्यातील नूतनीकरण, दुरुस्ती यावर साडेतीन कोटींचा खर्च करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडे पैसा आहे. मात्र बेस्ट उपक्रमाला देण्यासाठी पैसे नाहीत, अशी टीका युवासेना आदित्य ठाकरे यांनी केली. तर ठाकरे गटाचे नगरसेवक स्थायी समिती सदस्य यांनी मात्र बंगल्यावर होणाऱ्या साडेतीन कोटींच्या खर्चावर हवा तसा आक्षेप घेतला नाही. त्यामुळे शिवसेनेचे युवासेना प्रमुख सत्ताधारी पक्षावर टीका करतात मात्र त्यांचेच शिलेदार स्थायी समितीत मवाळ भूमिका घेतल्याने शिवसेनेची आक्रमकता गेली कुठे, अशी चर्चा पालिकेत सुरू आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात महापौर बंगला आहे. मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज होते. त्यामुळे प्रशासकीय काळात महापौर नसल्याने बंगला वापरात नव्हता. मात्र आता भाजप महायुतीची सत्ता आली असून भाजपच्या महापौर विराजमान झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात महापौर म्हणून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारली. जबाबदारी स्विकारल्यानंतर महापौर बंगल्यावर गृहप्रवेश करणे अपेक्षित होते. मात्र तीन महिने होत आले तरी त्यांनी गृहप्रवेश केलेला नाही.

महापौर रितू तावडे यांनी बंगल्याचे नुतनीकरण व दुरुस्ती करण्याची सूचना केली असून त्यासाठी ३ कोटी ४८ लाख २४ हजार ९३० रुपये खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य रमाकांत रहाटे यांनी आक्षेप घेत चार वर्षे बंगला बंद होता पण अनेक कंत्राटदार कार्यरत होते. त्यामुळे चार वर्षांत दुरुस्ती देखभाल का केली नाही, असा सवाल केला. मात्र आदित्य ठाकरे यांनी यावर जोरदार हल्लाबोल करत बेस्ट उपक्रमाला देण्यासाठी पैसे नाहीत, खासगीकरण हाती घेतले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिका महापौर बंगल्याच्या दुरुस्तीवर साडेतीन कोटी खर्च करणार आहे. या दुरुस्तीच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नुतनीकरण व दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी

Kalyan-Dombivli : अतिधोकादायक इमारतीतच KDMC चा आपत्कालीन कक्ष; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune : धरणांत १४ टक्के पाणीसाठा; पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे हाल होणार

सायबांच्या वाहनांना रेड कार्पेट! ब्रिटनच्या वाहनांना भारतात सवलत