क्रीडा

India at Olympics, Day 12 Full Schedule: विनेश फोगट अपात्र; मराठमोळा अविनाश साबळे इतिहास रचणार? भारताचे ७ ऑगस्टचे वेळापत्रक

Swapnil S

५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी कुस्तीपटू विनेश फोगट हिला मर्यादेपेक्षा काही ग्रॅम जास्त वजनामुळे ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आल्याने बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे विनेशकडून गोल्ड किंवा सिल्वर मेडल मिळण्याच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे. तथापि, बुधवारी भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि महिलांचा टेबल टेनिस संघ पदकासाठी दावेदारी सादर करणार आहे. याशिवाय बीडचा २९ वर्षीय स्टीपलचेसपटू अविनाश साबळे याने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान मिळवला आहे. आता बुधवारी मध्यरात्री अविनाश पदकासाठी 'दौड' घेईल. त्यामुळे तो ऐतिहासिक कामगिरी करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बघूया भारताचे आजचे वेळापत्रक :

आजचे वेळापत्रक

ॲथलेटिक्स

चालण्याचे मॅरेथॉन (पदक फेरी)

प्रियांका गोस्वामी, सूरज पनवार (मिश्र सांघिक प्रकार)

(सकाळी ११ वा.)

उंच उडी (पुरुषांची पात्रता फेरी)

सर्वेश कुशारे

(दुपारी १.३५ वा.)

भालाफेक (महिलांची पात्रता फेरी)

अन्नू राणी

(दुपारी १.५५ वा.)

महिलांची १०० मीटर अडथळा शर्यत

ज्योती याराजी (पात्रता फेरी)

दुपारी २.०९ वा.

तिहेरी उडी (पुरुषांची पात्रता फेरी)

प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबुबाकर

रात्री १०.४५ वा.

स्टीपलचेस शर्यत (अंतिम फेरी)

अविनाश साबळे

मध्यरात्री १.१५ वा.

-गोल्फ

महिलांची पात्रता फेरी

आदिती अशोक, दीक्षा डागर

(दुपारी १२.३० वा.)

-टेबल टेनिस

महिलांची उपांत्यपूर्व फेरी

भारत वि. जर्मनी

(दुपारी १.३० वा.)

-कुस्ती

उपउपांत्यपूर्व फेरी (५३ किलो)

अंतिम पंघाल वि. झेनेप येटगिल

(दुपारी ३.०५ वा.)

-वेटलिफ्टिंग

महिलांची अंतिम फेरी (४९ किलो)

मीराबाई चानू

(रात्री ११ वा.)

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला