बदलापूर प्रकरण : पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार; दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क भरणार संग्रहित छायाचित्र
ठाणे

बदलापूर प्रकरण : पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार; दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क भरणार

बदलापूर घटनेतील दोन्ही अल्पवयीन पीडित सामाजिक-शैक्षणिक देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुलींना आधार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : बदलापूर घटनेतील दोन्ही अल्पवयीन पीडित सामाजिक-शैक्षणिक देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुलींना आधार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींच्या इयत्ता दहावीपर्यंतच्या शैक्षणिक प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च 'एक वेळची विशेष बाब' म्हणून पूर्णपणे शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पीडित कुटुंबांना हा मोठा दिलासा मिळाला आहे तसेच यापुढे अशाच घटनांच्या बाबतीत शासनामार्फत कायमस्वरूपी मदतीबाबतदेखील शासन निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारार्थ आहे. दरम्यान, सरकार हा सर्व खर्च आरटीईअंतर्गत शाळांना देणार आहे.

त्या निष्पाप मुलींना केवळ न्याय मिळवून देणे एवढेच आमचे कर्तव्य नाही, तर त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हीदेखील आमची सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या पालकांवर शिक्षणाचा आर्थिक भार पडू नये, यासाठी आम्ही तातडीने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. दोन्ही लेकींनी कोणतीही चिंता न करता शिक्षण पूर्ण करावे, शासन त्यांच्या पाठीशी पालकाच्या भूमिकेतून खंबीरपणे उभे आहे.
दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका