Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व

समान वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण, शिक्षणाची संधी आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.
Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
Published on

दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याची जाणीव करून देणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे. समान वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण, शिक्षणाची संधी आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. यंदा महिला दिन येत्या रविवारी साजरा केला जाणार आहे.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
Skincare Tips : सकाळी की रात्री? Retinol ते Vitamin C वापरण्याची योग्य वेळ कोणती? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

महिला दिनाची सुरुवात २०व्या शतकात झाली. १९०८ मध्ये न्यूयॉर्क येथे महिला कामगारांनी कमी वेतन, जास्त कामाचे तास आणि मतदानाच्या हक्कासाठी ८ मार्च रोजी आंदोलन केले होते. त्यानंतर १९१० मध्ये समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. पुढे १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृत मान्यता दिल्यानंतर या दिवसाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स

आजच्या घडीला महिला दिन हा केवळ उत्सव नसून महिलांच्या सबलीकरणाचा आणि लैंगिक समानतेच्या वचनबद्धतेचा दिवस म्हणून ओळखला जातो. विविध देशांमध्ये परिषद, सन्मान समारंभ, जागरूकता मोहीमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतातही शिक्षण, आरोग्य, उद्योग, क्रीडा, विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. मात्र, महिला सक्षमीकरणाचा प्रवास अजूनही सुरू असून समान हक्क आणि संधींसाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
Women’s Day 2026 : महिला दिनानिमित्त उपयुक्त आणि स्टायलिश गिफ्ट आयडिया; यंदा द्या खास सरप्राईज

यंदाची थीम : Give To Gain

"जेव्हा आपण देतो, तेव्हा आपणच अधिक मिळवतो" हा २०२६ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा मुख्य संदेश आहे. Give To Gain ही थीम उदारता, सहकार्य आणि परस्पर समर्थनाची ताकद अधोरेखित करते. लिंगसमता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन योगदान देण्याचे आवाहन या मोहिमेतून करण्यात आले आहे.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

या अभियानाचा उद्देश समाजात देण्याची आणि सहकार्याची मानसिकता निर्माण करणे हा आहे. व्यक्ती, संस्था आणि समुदाय जेव्हा उदारपणे योगदान देतात, तेव्हा महिलांसाठी संधी आणि पाठबळ वाढते. देणे म्हणजे गमावणे नाही, तर जाणीवपूर्वक वाढ घडवून आणणे होय. महिलांचा विकास झाला तर संपूर्ण समाजाची प्रगती होते, हा या थीमचा मूलभूत संदेश आहे.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
हार्मोनल बदलांमुळे चिडचिड? Periods काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

दान, ज्ञानवाटप, संसाधने, पायाभूत सुविधा, दृश्यमानता, जनजागृती, शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन किंवा वेळ यापैकी कोणत्याही स्वरूपात केलेले योगदान महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरते. अशा सहकार्यामुळे अधिक समर्थ, परस्पर जोडलेले जग निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होतो.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
Leather Products for Women : हँडबॅग ते फुटवेअर! महिलांसाठी लेदरच्या कोणत्या वस्तू उपयुक्त?

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आणि त्यांचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जांभळा (Purple), हिरवा (Green) आणि पांढरा (White) हे रंग विशेष महत्त्वाचे मानले जातात. हे रंग महिलांच्या मताधिकार चळवळीचे प्रतीक असून, त्यांचा उगम १९०३ साली ब्रिटनमध्ये स्थापन झालेल्या Women’s Social and Political Union (WSPU) या संघटनेपासून झाला आहे.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
डी-टॅन म्हणजे काय? त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी किती फायदेशीर, जाणून घ्या माहिती

जांभळा रंग न्याय आणि सन्मानाचे प्रतीक आहे. तो महिलांच्या हक्कांच्या लढ्यातील निष्ठा आणि बांधिलकी दर्शवतो. हिरवा रंग आशा, नव्या संधी आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक मानला जातो. तर पांढरा रंग शुद्धता, एकजूट आणि महिलांच्या मताधिकारासाठी लढलेल्या स्त्रियांच्या संघर्षाचा सन्मान दर्शवतो. हे तीन रंग महिला सशक्तीकरणाच्या इतिहास, संघर्ष आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश देतात.

Women’s Day 2026 : ८ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, थीम आणि रंगांचे महत्त्व
उन्हाळ्यात स्वयंपाक करताना उकाड्याने आहात हैराण? महिलांनो 'या' खास टिप्स तुमच्यासाठीच, फॉलो करा आणि राहा स्वयंपाक घरात कूल

एकूणच, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून समानता, सन्मान आणि सशक्तीकरणाची जाणीव करून देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे.

logo
marathi.freepressjournal.in