लाईफस्टाईल

खरवस खायची क्रेविंग पण घरात चिकाचं दूध नाही? चिंता नको, झटपट घरच्या घरी बनवा मऊसूत खरवस; 'ही' आहे रेसिपी!

चिकाचं दूध नसलं तरी खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव अनुभवायची असेल, तर ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा...

Mayuri Gawade

खरवस ही अनेकांची आवडती मिठाई. एकदा त्या मऊ, हलक्या गोड चवीची आठवण आली की क्रेविंग कधी होईल सांगता येत नाही. पण नेमकं त्याच वेळी चिकाचं दूध घरात असेलच असं नाही. पूर्वी वाट पाहावी लागायची, आज मात्र नाही! आता उपलब्ध असलेल्या दुधातही तितक्याच सुंदर चवीचा, नीट सेट होणारा खरवस घरच्या घरी झटपट बनवता येतो.
चिकाचं दूध नसलं तरी खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव अनुभवायची असेल, तर ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य

  • दूध - १ कप

  • मिल्क पावडर - १ कप

  • दही - १ कप

  • कंडेन्स्ड मिल्क - १ कप

  • वेलची पूड - १ टेबलस्पून (आवडीनुसार)

  • अ‍ॅल्युमिनियम फॉईल - १ छोटा तुकडा

  • पाणी - गरजेनुसार

कृती

सुरुवात करा एका मोठ्या बाऊलमध्ये दूध ओतून. त्यात एक कप मिल्क पावडर घालून चमच्याने नीट मिसळा, जेणेकरून गुठळ्या राहू नयेत. मिश्रण एकसारखं झाल्यावर त्यात दही घालून पुन्हा ढवळा, जेणेकरून दही आणि दूध एकजीव होईल. त्यानंतर कंडेन्स्ड मिल्क घालून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळा.

तयार मिश्रण एका जाड लेयरच्या भांड्यात ओतून त्यावर वेलची पूड भुरभुरा. भांड्याचं तोंड अ‍ॅल्युमिनियम फॉईलने नीट झाका, जेणेकरून भांडे बंद राहील आणि वाफेत खरवस चांगला शिजेल. आता मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन हे भांडे त्यात ठेवा, वरून झाकण लावा आणि मंद आचेवर सुमारे ४० मिनिटांसाठी शिजवा.

शिजल्यावर टूथपिक घालून तपासा; काडी स्वच्छ बाहेर आली तर खरवस तयार आहे. भांडे गॅसवरून उतरवून थोडा गार होऊ द्या आणि नंतर १-२ तास फ्रिजमध्ये ठेवून थंड करा. थंड झाल्यावर खरवसाचे तुकडे कापून सर्व्ह करा.

खास टिप्स

  • खरवस नीट सेट होण्यासाठी वाफ कमी-जास्त होऊ देऊ नका.

  • जास्त गोड हवा असेल तर कंडेन्स्ड मिल्कचं प्रमाण थोडं वाढवू शकता.

  • वेलचीऐवजी केशर-दूधही वापरू शकता.

  • खरवस कापताना पूर्ण थंड झालेला असावा, म्हणजे तुकडे नीट पडतात.

चिकाचं दूध नसतानाही असा मऊसूत, थंडगार खरवस तयार झाला की समाधान वेगळंच असतं. अचानक आलेली गोडाची क्रेविंग असो किंवा पाहुण्यांसाठी खास मिठाई, हा बिना चिकाचा खरवस नक्कीच सगळ्यांची मनं जिंकेल.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग