लाईफस्टाईल

Republic Day Special: प्रजासत्ताक दिनासाठी खास तिरंगी इडली; वाचा सोपी रेसिपी

गाजर आणि पालकामुळे या इडलीत पोषणमूल्य वाढते. त्यामुळे ही रेसिपी केवळ दिसायला सुंदर नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

किशोरी घायवट-उबाळे

प्रजासत्ताक दिन म्हणजे देशभक्तीचा उत्साह. यंदा २६ जानेवारीला नेहमीच्या नाश्त्याऐवजी काहीतरी वेगळं करायचं असेल, तर तिरंगी इडली हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असलेली ही इडली दिसायला आकर्षक असून चवीला देखील स्वादिष्ट लागते. विशेष म्हणजे ही रेसिपी आरोग्यदायी आणि घरी सहज करता येण्यासारखी आहे.

तिरंगी इडलीसाठी लागणारे साहित्य

  • इडलीचं तयार पीठ (तांदूळ - २ कप, उडीद डाळ - १ कप, मेथी दाणे - अर्धा टीस्पून, मीठ - चवीनुसार, पाणी - आवश्यकतेनुसार)

  • गाजर प्युरी / फूड कलर (केशरी रंगासाठी)

  • पालक प्युरी / कोथिंबीर पेस्ट (हिरव्या रंगासाठी)

  • मीठ चवीनुसार

  • इडली साचा

  • तेल (साच्याला लावण्यासाठी)

तिरंगी इडलीची बनवण्याची कृती :

  • तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुवून ४ तास भिजवा. आधी उडीद डाळ थोड्या पाण्यात मिक्सरमध्ये मऊ दळून घ्या. नंतर तांदूळ जाडसर पण गुळगुळीत असे दळा. दोन्ही पीठ एका मोठ्या भांड्यात एकत्र करा. हाताने नीट मिसळा (यामुळे पीठ चांगलं फर्मेंट होतं). पीठ फार घट्ट किंवा फार पातळ नसावं. भांडे झाकून ८ ते १२ तास उबदार ठिकाणी ठेवा. पीठ फुलून वर येईल आणि थोडा आंबट वास येईल. पीठ आंबल्यानंतरच मीठ घाला आणि हलकेच मिसळा.

  • इडलीचं पीठ तीन समान भागांत वाटून घ्या.

  • पहिला भाग पांढऱ्या रंगासाठी तसाच ठेवा.

  • दुसऱ्या भागात गाजर प्युरी मिसळून केशरी रंग तयार करा.

  • तिसऱ्या भागात पालक प्युरी मिसळून हिरवा रंग तयार करा.

  • इडलीच्या साच्याला तेल लावून ग्रीस करा.

  • साच्यात आधी केशरी, मग पांढरा आणि शेवटी हिरवा असा थर द्या.

  • इडलीच्या साच्यात इडली १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.

  • गरमागरम तिरंगी इडली तयार!

सर्व्ह कशी कराल?

गाजर आणि पालकामुळे या इडलीत पोषणमूल्य वाढते. त्यामुळे ही रेसिपी केवळ दिसायला सुंदर नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तिरंगी इडली नारळाची चटणी आणि सांबरसोबत सर्व्ह करा. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही खास इडली नक्कीच आवडेल.

उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरण : सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात सुनेचा छळ; दीप्तीसोबत नेमकं काय झालं? आईने केला खुलासा

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

तिजोरीत खडखडाट, विविध कामांचा आराखडा कागदावरच; महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आरोप