'एआय' ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Holi 2026 : "आला होळीचा सण लय भारी"; धुलिवंदननिमित्त मित्र-परिवाराला द्या खास मराठी शुभेच्छा; सोशल मीडियावर करा शेअर

होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरे होणारे धुलिवंदन आणि त्यानंतरची रंगपंचमी हे नात्यांतील कटुता विसरून नव्याने रंग भरायचे प्रतीक मानले जाते.

किशोरी घायवट-उबाळे

रंगांचा, आनंदाचा आणि एकोप्याचा संदेश देणारा धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा केला जात आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरे होणारे धुलिवंदन आणि त्यानंतरची रंगपंचमी हे नात्यांतील कटुता विसरून नव्याने रंग भरायचे प्रतीक मानले जाते. सोशल मीडियाच्या युगात सणांच्या शुभेच्छा देण्याची पद्धतही बदलली आहे. WhatsApp, Facebook, Instagram Status आणि इतर माध्यमांवरून रंगीत शुभेच्छा शेअर करून आपण आपल्या मित्रपरिवाराला आनंदाचा संदेश देऊ शकता.

धुलिवंदन / रंगपंचमी शुभेच्छा

१. रंगांच्या उधळणीत आनंद दाटो, तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो!

धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

२. तुमच्या जीवनात नेहमी प्रेमाचे आणि विश्वासाचे रंग भरत राहो,

रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

३. द्वेष विसरून मैत्रीचे रंग उधळूया, आनंदाने रंगपंचमी साजरी करूया!

४. तुमच्या प्रत्येक स्वप्नांना यशाचा रंग लाभो,

धुलिवंदनाच्या रंगीत शुभेच्छा!

५. आनंद, उत्साह आणि भरभराटीचे रंग तुमच्या जीवनात सदैव नांदो!

रंगपंचमीच्या शुभेच्छा!

६. प्रेम, आपुलकी आणि एकोप्याच्या रंगांनी नाती अधिक घट्ट होवोत,

धुलिवंदन मंगलमय होवो!

७. रंगांच्या या सणात आयुष्य नव्या आशांनी रंगून जावो,

धूलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा!

८. जुने राग-रुसवे विसरून नव्या सुरुवातीचे रंग उधळूया,

रंगपंचमीच्या शुभेच्छा!

९. तुमच्या घरात सुखाचे, आरोग्याचे आणि यशाचे रंग कायम फुलत राहोत!

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने तुमच्या जीवनात आनंदाचे इंद्रधनुष्य खुलो!

हे संदेश तुम्ही थेट WhatsApp Status, सोशल मीडिया पोस्ट किंवा मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण