लाईफस्टाईल

Women's Day 2026 : "चालीनं तितक्या वाटा गं"; तुमच्या आयुष्यातील खास महिलांना द्या शुभेच्छा, शेअर करा Quotes आणि Messages

घर, शिक्षण, व्यवसाय, राजकारण, विज्ञान, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही शेअर करू शकता अशा काही खास शुभेच्छा संदेश या लेखात दिले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. समाजातील महिलांचे योगदान, त्यांची कर्तबगारी आणि त्याग यांना सलाम करण्याचा हा दिवस आहे. घर, शिक्षण, व्यवसाय, राजकारण, विज्ञान, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या खास दिवशी आपल्या आई, बहीण, पत्नी, मैत्रीण किंवा सहकाऱ्यांना WhatsApp, Facebook, Instagram Status किंवा सोशल मीडियावरून शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करता येतो. महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही शेअर करू शकता अशा काही खास शुभेच्छा संदेश या लेखात दिले आहेत.

महिला दिनाच्या खास शुभेच्छा

  • तिच्या धैर्याला सलाम,
    तिच्या स्वप्नांना मानाचा मुजरा…
    प्रत्येक स्त्रीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • जगण्याला नवी दिशा देणारी,
    घराला घरपण देणारी…
    प्रत्येक स्त्रीला महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

  • ती आई आहे, ती बहीण आहे,
    ती मैत्रीण आहे, ती प्रेरणा आहे…
    अशा प्रत्येक स्त्रीला महिला दिनाच्या शुभेच्छा!

  • तुमच्या स्वप्नांना उंच भरारी मिळो,
    तुमच्या कर्तृत्वाला जगभर दाद मिळो…
    महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • स्त्री ही केवळ शक्ती नाही,
    तर ती प्रेरणेचा झरा आहे…
    सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

  • तुमच्या कष्टांना आणि जिद्दीला सलाम…
    तुमचे आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून जावो.
    महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

  • तुमच्या स्वप्नांना नवे पंख मिळो,
    तुमच्या यशाने जग उजळून निघो…
    महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे. त्यामुळे या खास दिवशी सोशल मीडियावरून शुभेच्छा शेअर करत महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करा.

PF क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून आत्ताच करा 'हे' काम; EPFO चा सल्ला

डाबरच्या 'या' उत्पादनांवर FSSAI ची बंदी; ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप

'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

Pune : कौटुंबिक वादातून संतापजनक कृत्य! ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात टाकलं फेव्ही क्विक

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी मोठी अपडेट